नागपूर : नोटबंदीविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरातील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांसमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
येथील आरबीआयच्या कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जतही घातली.
दरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलास मुत्तेमवार आदींनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Maharashtra: Congress protest over #DeMonetisation in Nagpur, protesters lathicharged. pic.twitter.com/enbByLW79B
— ANI (@ANI_news) January 18, 2017
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आरबीआयसमोर लावलेले बॅरिकेड तोडून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले त्यांनी बॅरिकेड तोडलेही. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.