नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसचा रिझर्व्ह बँक इंडिया कार्यालयांना घेराव

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेसनं देशभरातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयांना घेराव घालण्याचं आंदोलन सुरू केले आहे. 

Updated: Jan 18, 2017, 01:26 PM IST
नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसचा रिझर्व्ह बँक इंडिया कार्यालयांना घेराव  title=

नागपूर : नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेसनं देशभरातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयांना घेराव घालण्याचं आंदोलन सुरू केले आहे. 

त्याचच भाग म्हणून आज नागपूरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
इकडे मुंबईत महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे अन्यायकारक नोटबंदी विरोधात रिझर्व्ह बँकेवर आज मोर्चा घेराव घालणार आहे. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

ते रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.