पुणे : नादान लोकांना छ संभाजी महाराज, छ शिवाजी महाराज समजले नाहीत, ते निवडणूका आल्या की जातीय तेढ निर्माण करतात, संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा काढणाऱ्यांना अटक झालीय, त्यांचे बोलविते धनी पण शोधून काढणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वडगाव शेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
येत्या २ वर्षात देशाचं स्टार्ट अप कॅपिटल बंगलोर असणार नाही तर ते पुणे असेल, त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी भाकीत वर्तविले.
आजच पुण्याच्या विकास आराखड्याला मंजूरी दिलीय , ९३७ पैकी ८५० आरक्षणं कायम ठेवून विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आल्याचेही घोषणा मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात केली.
काही लोक नोटाबंदीला विरोध करत आहेत, त्यांचं समर्थन कुणाला आहे? भ्रष्टाचाला आहे भ्रष्टाचारमुक्तीला, काळ्या पैशापासून मुक्तीला की काळा पैसा वाल्यांना ? असे सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले.