मुंबई : शुक्रवारी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया’तर्फे मे-जून महिन्यात घेतल्या गेलेल्या ‘सीए’ परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, पुण्यातल्या हर्षानं तिसरा क्रमांक पटकावलाय.
‘आयसीएआय’नं घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी अंतिम परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलाय तो जयपूरच्या संजय नवंधारनं त्याला 72.88 टक्के गुण मिळालेत.
देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे जोधपूरच्या कुणाल जेठानीनं... त्याला 72.50 टक्के गुण मिळालेत.
तर, पुण्यातल्या हर्षा भट्टड हिनं 71.75 टक्के गुण मिळवत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावलाय. हर्षा ही मुलींमध्येही पहिली आलीय.
ही अंतिम परीक्षा ग्रुप-1 आणि ग्रुप-2साठी घेण्यात आली होती. 'सीए'ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही ग्रुपमधील सर्व विषयांत उत्तीर्ण होणो अपेक्षित असते. या दोन्ही ग्रुपचा मिळून निकाल 7.29 टक्के लागला. या परीक्षेला देशभरातून ग्रुप-1 मध्ये 65,792 पैंकी 8884 विद्यार्थी पास झाले आहेत. तर ग्रुप 2 मध्ये 65,706 विद्यार्थ्यांपैकी 7004 विद्यार्थी पास झालेत. तर, दोन्ही ग्रुपसाठी एकूण 42,533 विद्यार्थी बसले होते. त्यापैंकी 3100 विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालंय.
हर्षा ही कटारिया हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने अकरावी आणि बारावी बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून (बीएमसीसी) पूर्ण केले. बारावीला तिला ८८ टक्के गुण होते. मात्र, नंतर तिने कॉमर्स विद्याशाखा सोडून फर्ग्युसन कॉलेजमध्ये आर्ट्सेला प्रवेश घेतला. गेल्या वर्षी तिने इकॉनॉमिक्समध्ये डिस्टिंक्शनसह बीए पूर्ण केले. सध्या ती इकोनॉमिक्समध्येच एमए करतेय. हर्षाचे वडील चंद्रकांत भट्टड यांचे गुरुवार पेठेत स्वतःचे दुकान असून, तिची आई प्रतिभा या गृहिणी आहेत. हर्षाची मोठी बहीण खुशबू हीसुद्धा सीए आहे. तिनेही सन २०१०मध्ये पहिल्याच प्रयत्नात सीए पूर्ण केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.