मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील सावर्डे येथे लागलेल्या भिषण आगीत पाच दुकाने भस्मसात झालीत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाला भेट देली
मुंबई-गोवा महामार्गालत असलेल्या सावर्डे येथील आधी तीन दुकानांना आग भिषण आग लागली. एका कपड्याच्या दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकृत कारण सांगण्यात आलेले नाही. कपड्याच्या दुकानाने पेट घेतल्यानंतर आगीचा भडका उडाला. बघता बघता आग पसरत चालली. या आगीत ५ दुकाने जळून खाक झाली आहेत.
या घटनेचे वृत्त कळताच अग्नीशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्नीशामन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, तोपर्यंत तीन दुकानांचा कोळसा झाला. घटनास्थळाला पालकमंत्री उद्य सामंत यांनी भेट देऊन पाहाणी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.