डोंबिवलीतील ही दुर्घटना दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. स्थानिक नेत्यांशी आम्ही संपर्कात असून युद्धपातळीवर बचावाचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
डोंबिवली स्फोट : चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, खत आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांचं विधान
डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवणार असल्याचं खत आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे, तसेच चौकशी करून, चौकशीचा अहवाल आल्यानंतर आपण कारवाई करू असं अहिर यांनी सांगितलं. ही कंपनी कुणाची आहे, यात कशाचं उत्पन्न घेतलं जातं याची माहिती घेणार असल्याचंही अहिर यांनी म्हटलंय.
हार्बट ब्राऊन कंपनी परिसरातील अर्धा किमीमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे पोलिसांनी आवाहन केलेय.
हार्बट ब्राऊन कंपनीत स्फोट झाल्याचे अधिकृत सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न
भीषण स्फोटात तीन ठार झाले असून ३७ जखमींवर डोंबिवलीतील AIMS या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
भीषण स्फोटामुळे डोंबिवली हादरली असून ४ ते ५ किलोमीटर परिसरात अजूनही हादरे बसत आहेत. लोका सैरावैरा धावत आहेत. धुराचे साम्राज पसरत असून धुराने परिसर आच्छादलाय.
मुंबई उपनगरातील डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात आचार्य केमिकल कंपनीत बॉयलर स्फोटात १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. परिसरात मोठ मोठे आवाज येत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
डोंबिवलीत पूर्व भागात सकाळी १०.४५ वाजण्याचा सुमारास केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाला. ४ ते ५ किमी अंतरावरील घरांना हादरा बसला तर काही घरांची तावदांना तडा केला. येथील मोबाईल सेवा विस्कळीत झालेय.
दरम्यान या स्फोटाचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून ३ ते ४ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. मात्र, या स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एका केमिकल कंपनीत झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या कंपनीच्या परिसरातील तीन किलोमीटरपर्यंतच्या घर-दुकानांच्या काचा तडकल्या आहेत.
या स्फोटात काही जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे, या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नसल्याने नक्की काय झालंय, हे समजू शकलेलं नाही.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, आचार्य केमिकल्स कंपनीच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे.
सुरूवातीला लोकांना भूकंपाचा स्फोट झाल्यासारखं वाटलं, त्यानंतर कुठेतरी स्फोट झाल्याचं लोकांना लक्षात आलं
स्फोटानंतर परिसरातील मोबाईल सेवा देखील विस्कळीत झाली आहे.