Akshay Kumar in 'Stree 3': बॉलीवूड मध्ये कित्येक चित्रपटात दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनेता अक्षय कुमार याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मागील वर्षीच अक्षय कुमारचे 'बडे मिया छोटे मिया', 'सरफिरा', 'खेल खेल में' आणि 'सिंघम अगेन' हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि यामधील सिंघम अगेन या चित्रपटाला मोठं यश मिळालं. याव्यतिरिक्त अक्षयने 'स्त्री 2' या चित्रपटात कॅमियो रोल सुद्धा केला होता. कॅमियो असूनसुद्धा अक्षयची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये अधिक पसंतीची ठरली. हा रोल चित्रपटाच्या यशाबद्दलच्या चर्चेचा विषय ठरला आणि यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला.
'स्त्री 2' या चित्रपटाने 800 कोटींहून अधिक कमाई केली आणि बॉलिवूडमधील सर्वात अधिक गडगंज कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटात अक्षयने सिरकटाच्या वंशजाची भूमिका साकारली होती. यावरुनच आता आगामी 'स्त्री 3' या चित्रपटात अक्षय कुमार पुन्हा या भूमिकेत दिसेल का? या प्रश्नाला घेऊन प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात अक्षय मोठ्या आणि मुख्य भूमिकेत दिसेल असा चाहत्यांमध्ये अंदाज बांधला जात आहे. नुकतंच, मॅडॉक फिल्म्सने 'स्त्री 3' या चित्रपटाची घोषणा करत चित्रपट ऑगस्ट 2028 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.
'स्काय फोर्स'च्या ट्रेलर लॉँचवेळी अक्षयने निर्माते दिनेश विजानसोबतच्या आपल्या या चित्रपटाबद्दल संवाद साधला. यावेळी अक्षय इथून पुढे सुद्धा या हॉरर कॉमेडी युनिवर्सचा भाग असतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अक्षयने हा निर्णय प्रोड्यूसर ज्योती आणि विजान घेणार असल्याचं स्पष्ट केलं. "या चित्रपटासाठी प्रोड्यूसरच पैसे लावतील आणि अमर कौशिक दिग्दर्शक असणार आहेत, त्यामुळे याबाबतीत मी काय बोलणार", असंही अक्षयने या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं. अक्षयच्या या विधानानंतर अक्षय या युनिवर्सचा भाग असतीलच कारण ते त्यांचे थानोस असल्याचं दिनेश यांनी स्पष्ट केलं.
स्त्री 2 मध्ये अक्षयने एक लहान कॅमियो रोल साकारला होता. या चित्रपटात अक्षय मानसिक अवस्था बिघडलेल्या रुग्णाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्या भूमिकेचं नाव सुद्धा समोर आलं नव्हतं जेणेकरुन चित्रपटाच्या पुढील भागासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली जावी. चित्रपटात सिरकटाच्या वंशाच्या अंतिम सदस्याच्या भूमिकेत अक्षय दिसला होता. आगामी 'स्त्री 3' चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमर कौशिकच्या निर्देशनात बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतभर 600 कोरोडोंची कमाई करत जवळपास दीड महिने वर्चस्व स्थापित केलं. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरसोबत पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसले होते. अक्षय कुमार व्यतिरिक्त वरुण धवनने साकारलेली लांडग्याची भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.