बिल्डर डी एस कुलकर्णी यांच्या कारला अपघात

बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला आहे, यात ते जखमी झाले आहेत, तर त्याच्या चालकाचा मात्र मृत्यू झाला.

Updated: May 26, 2016, 10:18 AM IST
बिल्डर डी एस कुलकर्णी यांच्या कारला अपघात title=

पुणे : बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला आहे, यात ते जखमी झाले आहेत, तर त्याच्या चालकाचा मात्र मृत्यू झाला.

डी.एस कुलकर्णी यांचा बुधवारी रात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. 
 
मुंबईहून बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याला जाताना खंडाळा एक्झिटजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या डाव्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 डी एस कुलकर्णी यांना अपघातानंतर तात्काळ लोकमान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये ते तिघे जण होते.

बिल्डर दीपक सखाराम कुलकर्णी हे डी. एस. के या नावाने सुप्रसिद्ध आहेत. ‘घराला घरपण देणारी माणसं’ हे डी. एस. के यांचं घोषवाक्य आहे.