गोविंद पानसरे यांचा जीवनपट

 ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार आणि श्रमिकांचे कैवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईत निधन झालं. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जीवनपटावर टाकलेली एक नजर.

Updated: Feb 21, 2015, 01:00 PM IST
गोविंद पानसरे यांचा जीवनपट  title=

कोल्हापूर :  ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार आणि श्रमिकांचे कैवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईत निधन झालं. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जीवनपटावर टाकलेली एक नजर.

कोल्हापुरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये त्यांची पत्नी उमा याही गंभीर  जखमी झाल्या होत्या. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे  यांचा
जन्म २६ नोव्हेंबर १९३३ ला कोल्हार (ता. श्रीरामपूर) जि. नगर. येथे झाला. त्यांचे प्राथमिक  शिक्षण  कोल्हार येथे तर माध्यमिक राहुरीत झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. त्यांनी बीए (ऑनर्स) केले. त्यानंतर शहाजी लॉ कॉलेजमध्ये एलएल.बी. केली.

व्यवसाय -  कोल्हापुरातील सुरवातीचे काही दिवस वृत्तपत्र विक्रेत्याचे काम. 
कोल्हापूर पालिकेत काही दिवस ऑक्‍ट्रॉय विभागात शिपाई. 
पदवीनंतर काही काळ प्राथमिक शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून अध्यापन. 
1964 मध्ये वकील व्यवसायास प्रारंभ; वंचित, गोरगरिबांचे खटले मोफत चालविले. 
कामगार आणि औद्योगिक कायद्यातील निष्णात वकील. 
कोल्हापूर जिल्हा बारअसोसिएशनचे अध्यक्ष. 
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात सहयोगीव्याख्याता म्हणून सुमारे दहा वर्षे अध्यापन. 

पानसरे यांची राजकीय कारकिर्द
१) समाजवादी आणि डावा समाजवादी गट यात प्राथमिक कार्य 
२)  1952 पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद 
३)  दहा वर्षे भारतीय कम्यनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव 
४)  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेराष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य 
५)  1955 - गोवामुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग 
६)  संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचे सचिव म्हणून पाच वर्षे जबाबदारी 
७)  1965 उपासमारविरोधी कृती समितीचे नेते; या आंदोलनात महत्त्वाचा सहभाग 
८)  ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष 
९)  इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी या संस्थेच्या स्थापनेत सहभाग; पंचवीस वर्षेकार्यकारिणीवर सदस्य 
 
गोविंद पानसरे यांचे लेखन कार्य

१) शिवाजी कोण होता ? (1984)चोवीस आवृत्त्या, सुमारे एक लाख प्रतींची विक्री - कानडी, उर्दू,गुजराथी, इंग्रजी, हिंदी भाषांत अनुवाद 
२)  मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्‍न (1983) चार आवृत्त्या 
३)  अजून न स्वीकारलेला मंडल आयोग (1997) दोन आवृत्त्या 
४)  मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम ( 1998) 
५)  काही कामगार कायद्यांची तोंडओळख (1992) चार आवृत्त्या 
६)  370 कलमांची कुळकथा (1994) 
७7)  मुस्लिमांचे लाड ( 1994) तीन आवृत्त्या 
८)  पंचायत राज्याचा पंचनामा 
९)  अवमूल्यन - कळ सोसायची कुणी? 
१०)  राजर्षी शाहू -  वसा आणि वारसा (तीन आवृत्त्या) 
११) कामगारविरोधी कामगार धोरणे (तीन आवृत्त्या) 
१२) वृत्तपत्रांतून अनेक लेख,मंडल आयोग आणि शिवचरित्रावर महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने  

मिळालेले पुरस्कार 
१) भीमक्रांती पुरस्कार 
२)  सामाजिक कार्यासाठी "भाई माधवराव बागल' पुरस्कार -1998 
३)  कोल्हापूर महापालिकेचा "कोल्हापूर भूषण' पुरस्कार -2002 
४)  क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले पुरस्कार, नाशिक 2008 
५)  कॉ. दत्ता देशमुख पुरस्कार,कोल्हापूर - 2009 
६)  राजर्षी शाहू पुरस्कार,कोल्हापूर 

पानसरे आणि संस्था व संघटना 
१) दळप-कांडप गिरणीमालक संघ 
२)  मेकॅनिकल व इंजिनियरिंगकामगार संघ 
३)  कोल्हापूर फेरीवाले युनियन 
४)  करवीर कामगार संघ 
५)  कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकर युनियन 
६) कोल्हापूर ड्रिस्ट्रिक बॅंक एम्लॉईज युनियन 
७)  सदर्न महाराष्ट्र बॅंक एम्लॉईज युनियन (रत्नाकर बॅंक ए. यु.) 
८)  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कामगार संघ 
९)  कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघ 
१०)  कोल्हापूर जिल्हा सह संस्था गट सचिव संघटना 
११)  कोल्हापूर जिल्हा घरेलू कामगार मोलकरणी संघटना 
१२)  कोल्हापूर जिल्हा "आशा'कर्मचारी संघटना 
१३)  कोल्हापूर जिल्हा शेतमजूर संघटना 
१४)  कोल्हापूर जिल्हा बेघर झोपडपट्टी संघटना 
१५)  कोल्हापूर जिल्हा म्युनिसिपल कामगार संघ 
१६)  कोल्हापूर जिल्हा अंशकालीन परिचय कामगार संघटना 
१७)  करवीर ऑटोरिक्षा युनियन 
१८)  श्रमिक प्रतिष्ठान 
१९)  श्रमिक सहकारी पतसंस्था 
२०)  आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह साह्यता केंद्र 
२१)  ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन 
२२)  ऑल इंडिया यूथ फेडरेशन 
२३)  आम्ही भारतीय लोक आंदोलन 
२४)  समाजवादी प्रबोधिनी 
२५)  भारतीय महिला फेडरेशन 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.