अमित शहा नागपूरात दाखल

आजपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भाग घेण्याकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूरला पोचलेत. 

Updated: Mar 13, 2015, 10:40 AM IST
अमित शहा नागपूरात दाखल  title=

नागपूर : आजपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भाग घेण्याकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूरला पोचलेत. 

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अमित शहा उपस्थित राहणार असून, गेल्या दोन आठवड्यात त्यांचा नागपूरचा हा दुसरा दौरा आहे. होळीच्या दिवशी म्हणजे ६ मार्चला देखील ते नागपूरला आले होते आणि तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. 

नागपूरच्या रेशीमबाग कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत ते राम माधव आणि राम लाल यांच्यासह भाजपचे प्रतिनिधित्व करतील. दिल्लीहून नागपूरला आलेले अमित शहा विमानतळावरूनच सरळ रेशीमबाग कार्यालयात पोचले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.