संघातून 'ब्रह्मचर्य' हद्दपार होणार?

नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला सुरुवात झालीय. काही वेळापूर्वी या तीन दिवसीय प्रतिनिधी सभेचं उदघाटन झालंय.

Updated: Mar 13, 2015, 10:35 AM IST
संघातून 'ब्रह्मचर्य' हद्दपार होणार? title=

नागपूर  : नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला सुरुवात झालीय. काही वेळापूर्वी या तीन दिवसीय प्रतिनिधी सभेचं उदघाटन झालंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यशैलीमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये दोन मोठे बदल अपेक्षित आहेत. सध्या प्रचारकांना संपूर्ण ब्रह्मचर्य पाळावं लागतं. मात्र संघामध्ये यावर विचारमंथन सुरू झालंय. संघाच्या म्हणजेच पूर्णवेळ घराबाहेर राहून संघ प्रचाराचं काम करणाऱ्यांना विवाह करण्याची परवानगीही दिली जाऊ शकते. 

तसंच, संघाच्या सध्याच्या गणवेशामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. डीएनए वृत्तपत्राला संघाचे प्रचारक प्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिलेल्या मुलाखतीमधून काही बाबी उघड झाल्यात. संघाच्या गणवेशामध्ये अनेकदा बदल झाले असल्याचं वैद्य यांनी स्पष्ट केलंय. 

गेल्या काही काळापासून देशातल्या सर्व सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आकर्षण वाढलं असून याचा परिणाम देशात संघाचं जाळं वाढण्यात झालाय. गेल्या काही काळात संघाच्या सर्वच प्रकारच्या शाखांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झालीय. संघाचं काम प्रभावीपणे कसं वाढवायचं यावर या प्रतिनिधी सभेत विचार मंथन होणार आहे.. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संघटन मंत्री, राम माधव आणि संघ परिवारातल्या इतर संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत हजेरी लावणारेत. या शिवाय देशात मातृभाषेतल्या शिक्षणाला कसं महत्व द्यायचे यावर ही तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत विचार होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.