नाशिक : व्हॉट्स अप, फेसबूकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, व्हीडीओ पसरवून अफवा पसरवणा-या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आलीये.
दोन गटातील तणावामुळे ग्रामीण भागातील आठ गावात लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी उद्यापर्यंत परिस्थिती पाहून उठवली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि परिसरात तणावाचे वातावरण आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच सोशल मीडियातून अफवा पसरू नये यासाठी या परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आले होते.