ठाणे : बाबा मी खूप चिंतत आहे. कृपा करून काही उपाय करा माझी चिंता दूर होईल.... बच्चा तुझी चिंता दूर होईल पण त्याच्यासाठी एक अविवाहित मुलगी आणावी लागेल. मी जसे-जसे तिच्याशी शारीरिक संबंध बनवेल तस-तसे तुझे दुःख दूर होती... हो असे भोळ्या भाबड्या नागरिकांना फसविणाऱ्या आणि पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला डोंबिवलीमध्ये अटक करण्यात आली.
विजय ठुमरे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. ठाणे पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनीटने ही कारवाई केली. आतापर्यंत २३ मुली या भोंदू बाबाच्या अत्याचाराच्या बळी ठरल्याची प्राथमिक माहिती आहे.
अत्याचारग्रस्त सर्व मुली अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. ठाणे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. ल;लक्ष्मीनारायण यांना ढोंगी बाबाबद्दल माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चाईल्ड प्रोटेक्शन युनीटचे इन्चार्ज मदन बल्लाळ यांच्या टीमने काम सुरु केले.
डोंबिवली येथील गांधीनगर स्थित एका उच्चभ्रू वस्तीतील वसंत विहार सोसायटीमध्ये हा बाबा राहत होता. या बाबाकडे एक महिला एजंट एका अल्पवयीन मुलीला घेऊन आली असता पोलिसांनी या ढोंगी बाबाला रंगेहात अटक केली. विजय ठुमरे हा ढोंगी बाबा या मुलींच्या घरी पैशांचा पाऊस पडेल, असे सांगत त्यांच्यावर लैगिक अत्याचार करायचा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.