१५ वर्षीय मुलीचे धाडस, पुण्यात बालविवाह उधळून लावला

येथे एका १५ मुलीने धैर्याने स्वतःचा होत असलेला बालविवाह उधळून लावला. विशेष म्हणजे या मुलीच्या आईवडिलांनीच हा बालविवाहाचा घाट घातला होता.

Updated: Jan 21, 2016, 08:25 PM IST
१५ वर्षीय मुलीचे धाडस, पुण्यात बालविवाह उधळून लावला title=

पुणे : येथे एका १५ मुलीने धैर्याने स्वतःचा होत असलेला बालविवाह उधळून लावला. विशेष म्हणजे या मुलीच्या आईवडिलांनीच हा बालविवाहाचा घाट घातला होता.

वडिलांना दारूचं व्यसन होतं. आईला रोज होणारी मारहाण तिला असह्य करत होती. उच्च शिक्षण घेण्याचं तिचं स्वप्न होतं. पण अचानक आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. तिच्या इच्छेविरूद्ध नात्यातलाच एक २५ वर्षांचा जोडीदारही ठरवला. २६ एप्रिलला लग्न होणार होतं. त्याआधी टिळ्याचा कार्यक्रमही झाला. लग्नासाठी मंगल कार्यालयाची नोंदणीही केली. 

लग्नाला मुलगी तयार नव्हती त्यामुळे सर्वप्रकारे मुलीवर दबावही वाढवण्यास सुरुवात केली. अखेर मुलीने नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेत लग्नाचा हा डाव उधळून लावलाय. 

पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रतिभा जोशी यांनी या मुलीच्या आई वडिलांना बोलावून समज दिलीय. तसंच मनाविरूद्ध लग्न तसेच बालविवाह केल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांचीही जाणीव पालकांना करून दिली.