अमेरिका: विमान-हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्वच्या सर्व 67 जणांचा मृत्यू झाल्याची भिती; हाडं गोठवणाऱ्या नदीत मृतदेह

US Jet Helicopter Crash: वॉशिंग्टन डीसीच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कोणी जिवंत वाचलं नसेल असं सांगितलं आहे. यामुळे आता बचावकार्याचं रुपांतर रिकव्हरी ऑपरेशनमध्ये करण्यात आलं आहे. वाहतूक सचिवांनी सांगितलं आहे की, दुर्घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्सचं विमान पोर्टेमाक तीन तुकड्यात सापडलं.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2025, 08:27 PM IST
अमेरिका: विमान-हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्वच्या सर्व 67 जणांचा मृत्यू झाल्याची भिती; हाडं गोठवणाऱ्या नदीत मृतदेह

US Jet Helicopter Crash: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ आकाशातच अमेरिकन एअरलाइन्सचं एक विमान आणि हेलिकॉप्टर यांच्या भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की, मोठा स्फोट होऊन विमान आणि हेलिकॉप्टर यांचे तुकडे झाले आणि नदीत जाऊन कोसळले. दरम्यान वॉशिंग्टन डीसीच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कोणी जिवंत वाचलं नसेल असं सांगितलं आहे. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व 67 जणांचा मृत्यू झाल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत 28 मृतदेह हाती लागले आहेत.

वॉशिंग्टन डीसीच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कोणी जिवंत वाचलं नसेल असं सांगितलं आहे. यामुळे आता बचावकार्याचं रुपांतर रिकव्हरी ऑपरेशनमध्ये करण्यात आलं आहे. कारण यामधून कोणीही वाचलं असेल असं त्यांना वाटत नाही. वाहतूक सचिवांनी सांगितलं आहे की, दुर्घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्सचं विमान पोर्टेमाक तीन तुकड्यात सापडलं. 

 

कोणत्या नदीत कोसळलं विमान

दुर्घटनेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत पडले. ही युनायटेड स्टेट्सच्या मध्य-अटलांटिक प्रदेशातील एक प्रमुख नदी आहे. हे वेस्ट व्हर्जिनियामधील पोटोमॅक हायलँड्सपासून मेरीलँडमधील चेसापीक खाडीपर्यंत वाहते. पोटोमॅक नदी 405 मैल लांब आहे. ही अमेरिकेतील 21 वी सर्वात मोठी नदी आहे. त्याच्या पाणलोट क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोक राहतात. या नदीत जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे कारण नदीचे तापमान इतके कमी आहे की पोहूनही पाण्यातून बाहेर पडता येत नाही.

विमानात होते 64 प्रवासी

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, अमेरिकी ईगल फ्लाइट 5342, जे रिगन नॅशनल एअरपोर्टजवळ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकलं, त्यामधील सर्व 64 प्रवासी आणि क्रू मेम्बर्सचा मृत्यू झाल्याची भिती आहे. दरम्यान बचावकार्यादरम्यान 28 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

रिपोर्टनुसार, हे एक छोटे प्रवासी विमान होते जे कॅन्ससहून वॉशिंग्टनला येत होते. विमानात 65 प्रवासी बसण्याची क्षमता होती. अपघाताच्या वेळी विमानात 64 प्रवासी होते, असं सांगण्यात येत आहे. तर लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. विमान विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या अमेरिकन आर्मीचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर त्याच्यावर आदळले. यानंतर दोघेही क्रॅश होऊन पोटोमॅक नदीत पडले. ज्या हेलिकॉप्टरला विमानाची टक्कर झाली ते सिरोस्की H-60 ​​हेलिकॉप्टर होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x