महाराष्ट्रात पुन्हा मोठा घोटाळा! गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परप्रांतीय बहिणी लाडक्या कशा?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एक रॅकेट काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. काही परप्रांतिय चक्क लाडकी बहीण योजनेचे पैसे खाताहेत. त्याची संख्या काही हजारात आहेत. या परप्रांतीय लाडक्या बहिणींचं रॅकेट कसं उघड झालं जाणून घेऊया.  

वनिता कांबळे | Updated: Jan 31, 2025, 10:06 AM IST
महाराष्ट्रात पुन्हा मोठा घोटाळा! गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज;  परप्रांतीय बहिणी लाडक्या कशा? title=

Ladki Bahin Yojana Maharashtra :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लातूर, सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यात राहणाऱ्या महिलांनी महाराष्ट्रात १,१७१ अर्ज भरले. मात्र प्रत्यक्ष तपासात या अर्जदार उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील असल्याचं उघड झालंय. याप्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. एकट्या बार्शी तालुक्यात 22 बोगस अर्ज आले होते. त्यांना मिळणारे पैसे आता तातडीनं थांबवण्यात आलेत. 

बार्शी तालुक्यातील एका गावात मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले.प्रत्यक्ष गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही. अधिकाऱ्यांकडून आधारकार्ड क्रमांक, बँक खात्याच्या आधारे तपासणी करण्यात आली.  ही बनावट खाती उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थानातील असल्याचं उघड जाले.  यात लॉगईन आयडीचा गैरवापर झाल्याचं लक्षात आले.

बनावट लॉगिन आयडीचा गैरवापर करुन हा घोटाळा करण्यात आला. सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती. एका लॉगईन आयडीवर अनेक अर्ज भरण्याची सोय आहे. ‘मुनमुन ठाकरे, अंगणवाडी सेविका, हजारवाडी, जि. सांगली’ ‘अनवरा बेगम, अंगणवाडी सेविका, बोरगाव बु., जि. लातूर’  या 2 बनावट आयडीद्वारे तब्बल 1,171 अर्ज भरले गेले. प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचं उघड झाले. 

या परप्रांतिय ठगांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना नकली आधार क्रमांक वापरून अस्पष्ट प्रती अपलोड केल्या, ज्यामुळे पडताळणीवेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती. याचाच फायदा घेऊन लाडक्या बहिणीचे पैसे लाटले गेले. मात्र सध्या पोलीस, महसूल, तसंच महिला व बालविकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आता उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थानातील या फसव्या बहिणींविरोधात गुन्हे दाखल झालेत आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खरंतर मुंबई ठाण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात गेल्या अनेक दशकापासून परप्रांतीय महाराष्ट्रीय म्हणूनच राहताहेत. मात्र राज्य सरकारला गंडा घालणाऱ्या या बोगस लाडक्या बहिणी दुसऱ्या राज्यात बसून राज्यातल्या योजनांचं श्रीखंड हडपताहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होणं. आणि इतर राज्यातही असे प्रकार घडलेत का हे शोधणं आता गरजेचं आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x