अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय.
महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये एका सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी ‘पाकिस्तानला आपल्या करामतींचं योग्य उत्तर मिळालंय. सीमेवर उभ्या असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्यूत्तर देऊन त्यांचं तोंडच बंद करून टाकलंय... पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय... आता पाकिस्तान पुन्हा अशी चूक पुन्हा करणार नाही’ असं म्हटलंय.
‘काँग्रेस बॉर्डरवर सुरु असलेल्या गोळीबारावरून सरकारवर टीका करत आहे पण ही टीका करण्याची वेळ नाही तर गोळीबाराची वेळ आहे’ असं म्हणत त्यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधलाय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी जम्मू-काश्मीरच्या सीमेवर तसंच नियंत्रण रेषेवर भारतीय सेनेचे जवान शहिद होत असताना मोदी गप्प असल्याची टीका केली होती.
नरेंद्र मोदी यांनी यावेली पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये झालेली नुकसान भरपाई करण्याचीही यावेळी घोषणा केलीय. ‘या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या जनतेला केंद्र सरकारकडून मदत मिळेल... ज्यांना धास्तीमुळे गाव सोडावं लागलंय त्यांनाही मदत मिळेल’ असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे, बऱ्याच दिवसांपासून पक्षाच्या प्रचारासाठी फिरतीवर असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा आज गळा खराब होता. त्यांच्या घशालाही त्रास होते होता. त्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केलं.
इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर ते मातीतूनही सोनं काढतील, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांनाही भाजपलाच मतदान करून पूर्ण बहुमत देण्याचं आवाहन केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.