निवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र येतील - आठवले

गेल्या २५ वर्षांची युती तोडून वेगवेगळ्या मार्गाने जाताना एकमेकांवर वाट्टेल तसं तोंडसुख घेणारे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. 

Updated: Oct 15, 2014, 01:34 PM IST
निवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र येतील - आठवले title=

मुंबई : गेल्या २५ वर्षांची युती तोडून वेगवेगळ्या मार्गाने जाताना एकमेकांवर वाट्टेल तसं तोंडसुख घेणारे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. 

आज, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात कुणाची लहर आहे? असा प्रश्न आठवले यांना विचारण्यात आला तेव्हा आठवले यांनी महाराष्ट्रात 'शिवसेना-भाजप-आरपीआय'च्या महायुतीचीच हवा असल्याचं सांगितलंय. 

'महायुती' पुन्हा अस्तित्वात येईल असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केलाय. इतकंच नाही तर शिवसेना-भाजपची पुन्हा मैत्री होण्यासाठी गरज असल्यास आपणही प्रयत्न करायला तयार असल्याचं म्हटलंय. 

पण, शिवसेना-भाजपमध्ये असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत काय? असं विचारल्यानंतर आठवले यांनी 'ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील, त्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल दोन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा... शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर त्यांचा मुख्यमंत्री बनू शकेल... भाजपच्या जागा जास्त असतील तर त्यांचा...' असा मध्यस्थिचा मार्गही आठवलेंनी सुचवलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.