मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम अजून जाहीर झाला नसला तरी भाजपा मोदींना लवकरात लवकर राज्याच्या दौऱ्यावर आणण्याच्या प्रयत्नात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांचे ४ तारखेपासून निवडणुकांसाठी दौरे सुरु होत आहेत. ४ ऑक्टोबरला पंढरपुरच्या विठ्ठलाचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या निवडणुक दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यावेळी ते वारकऱ्यांशी काही वेळ संवाद साधणार आहेत. त्यानंतर, त्यानंतर पहिल्याच दिवशी कोल्हापूर , बीड आणि मुंबई अशा मोदींच्या एकूण तीन सभा होणार आहेत.
या विधानसभा निवडणुकी दरम्यान नरेंद्र मोदींच्या राज्यभरात जवळपास २५ सभा होणार असल्याचं सांगण्यात येतंय... त्यामुळे, भाजप लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मोदी कार्ड पुरेपूर वापरण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय.
शिवसेना - भाजपच्या मोडलेल्या २५ वर्ष जुन्या संसाराविषयी मोदी काय म्हणणार? गोध्रा हत्याकांडानंतर ज्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता त्या बाळासाहेबांची आठवण मोदींना येणार का? याकडेही अनेकांचं लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.