www.24taas.com, लंडन
खूप साऱ्या सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमधले सेक्स हॉर्मोन टेस्टोटेरोनच्या पातळीत वाढ होत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. शरीरातील नव्वद टक्के डी व्हिटामिन त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रक्रियेतून निर्माण होतं.
ऑस्ट्रियातील ग्राझ मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते व्हिटामिनच्या अधिक प्रमाणामुळे टेस्टोटेरोनवर सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांनी केलेल्या संशोधनाअंती ज्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात ब्लड व्हिटामिन डी असतं त्यांच्या टेस्टोटेरोनची पातळी तुलनेने अधिक असते. जे पुरुष व्हिटामिन डी पुरेशा प्रमाणात शरीराला मिळेल याबद्दल काळजी घेतात त्यांच्यात टेस्टोटेरोनची पातळी चांगली असते आणि अर्थातच लिंगामधील जोशही जबरदस्त असतो. अर्थातच त्यामुळे सेक्सची भूकही जबरदस्त निर्माण होते हे वेगळं सांगायला नकोच.