'हो मी नरेंद्र मोदी यांची मुलगी आहे'

मधुर भांडारकरचा सिनेमा 'कॅलेंडर गर्ल्स'मध्ये गुजराथी मॉडेल अवनी मोदी, एका पाकिस्तानी मॉडेलच्या रोलमध्ये दिसणार आहे. अवनी मॉडेल यांनी आपल्या बद्दल सांगितलं.

Updated: Sep 15, 2015, 04:33 PM IST
'हो मी नरेंद्र मोदी यांची मुलगी आहे' title=

मुंबई : मधुर भांडारकरचा सिनेमा 'कॅलेंडर गर्ल्स'मध्ये गुजराथी मॉडेल अवनी मोदी, एका पाकिस्तानी मॉडेलच्या रोलमध्ये दिसणार आहे. अवनी मॉडेल यांनी आपल्या बद्दल सांगितलं.

अवनी मोदीचं शिक्षण गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालं आहे, लहानपणापासून मला अॅक्टिंगची आवड होती, शाळेत मी नाटकांमध्ये सहभाग घेत होती.

अवनी मोदींचं यापूर्वी कुणीही सिनेजगतात नव्हतं, पण तरीही दोन तमिळ फिल्म आणि एका इंटरनॅशनल शॉर्ट फिल्ममध्ये अवनीने काम केलं आहे.

अवनी मोदी आणि पंतप्रधान मोदी
अवनी मोदी ही गुजरातची आहे, पंतप्रधान देखील गुजरातचे आहेत, तेव्हा अवनी मोदी यांना आडनावावरून विचारण्यात आलं की, पीएम तुमचे लांबचे किंवा जवळचे नातेवाईक आहेत का?

यावर अवनी मोदी म्हणाली, मला अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात येतो. चित्रपटाचं शुटींग सुरू असताना एकाने मला विचारलं होतं, तो विचारणारा परदेशी होता, प्रश्न हाच होता, तुम्ही मोदींच्या नातेवाईक आहात का?, त्यावर मी त्याला सांगितलं हो, मी त्यांची मुलगी आहे, आणि यात खोटं काय आहे?, मोदी आडनावाचीच नाही, गुजरातचीच नाही, तर देशातील प्रत्येक मुलगी ही नरेंद्र मोदी यांची कन्याच आहे, असं अवनी मोदीने म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.