मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्याच बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंहनं तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि इतर लोकांसमोर लाज काढली. मिळालेल्या माहितीनुसार फिल्म तमाशाच्या सेटवर ही घटना घडली. या चित्रपटात रणबीर आणि दीपिका एकत्र आहेत.
एका वृत्तपत्रातील बातमीनुसार दीपिका सध्या कोर्सिकामध्ये आपला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत इम्तियाज अलीचा चित्रपट तमाशाचं शूटिंग करतेय. या दरम्यान दीपिकाला भेटण्यासाठी रणवीर सिंह तिथं पोहोचला. रणवीर पोहचल्यानंतर इतका एक्साइटेड झाला की लगेच दीपिकाच्या सेटवर पोहोचला. शूटिंग दरम्यान जेव्हा दीपिकाचा कोणताही शॉट असायचा तेव्हा रणवीर मॉनिटरसमोर उभा राहायचा आणि शॉट बघायचा. इम्तियाज कट म्हणताच रणवीर तिनं न विचारताच आपलं मत सांगायचा.
दीपिकाच्या प्रत्येक शॉटवर रणवीर तिला चिअर करायचा. सोबतच दीपिकाला शॉट चांगला करण्यासाठी सल्ला द्यायचा. रणवीरच्या या वागण्यामुळं दीपिकाची आपल्या संपूर्ण क्रू समोर लाज काढली. तर रणवीरला आपल्या या वागण्याचा काहीच फरक पडत नसल्याचं दिसलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.