ब्रेक-अप नंतर काय सुरू आहे रणबीर कतरिनाचं?

मुंबई : गेले काही दिवस बी-टाऊन मध्ये चर्चा आहे ती रणबीर - कतरीनाच्या ब्रेक-अपची... 

Updated: Jan 21, 2016, 04:01 PM IST
ब्रेक-अप नंतर काय सुरू आहे रणबीर कतरिनाचं? title=

मुंबई : गेले काही दिवस बी-टाऊन मध्ये चर्चा आहे ती रणबीर - कतरीनाच्या ब्रेक-अपची... जानेवारीतच्या पहिल्या आठवड्यात दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बुधवारी मुंबई पोलिसांसाठी केलेल्या एका कार्यक्रमातही दोघे वेगवेगळे आले. कार्यक्रम संपल्यावर रणबीर कतरीनाच्या मॅनेजरशी पाच मिनिटं बोलत होता. पण कतरिना तिथे असूनही रणबीर जाईपर्यंत ती दुसरीकडेच रेंगाळताना दिसली.

रणबीर गेल्यावर ती आपल्या आगामी 'फितूर' या सिनेमाचा हिरो असलेल्या आदित्य रॉय कपूर सोबत दिसली. 

रणबीर-कतरीना यांच्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या काळात रणबीरने बांद्र्यात १५ लाख रुपये भाड्यानं घेतलेला फ्लॅटही आता रिकामा आहेत. फ्लॅटच्या किल्ल्या कतरिनाकडेच आहेत. तर आजकाल रणबीरची गाडी आणि बाईक त्याच्या आई-बाबांच्या घराखाली उभी दिसते. कतरिनाही आता तिच्या जुन्या घराखाली दिसते. 

रणबीर आजकाल आपल्या मित्रपरिवारासोबत व्यस्त असतो, तर कतरिना फिल्मच्या प्रमोशनसाठी जास्तीत जास्त वेळ द्यायला लागलीय.

'जग्गा जासूस' या अडकलेल्या शूटिंगच्या फिल्मलाही पुन्हा सुरुवात होतेय. पण, आता पूर्वीप्रमाणे रणबीर-कतरिना एकच व्हॅनिटी व्हॅन वापरणार नसून तिने निर्मात्याकडे आता वेगळ्या व्हॅनिटीची मागणी केल्याचं समजतंय.