शाहरुखच्या गर्ल्स गँगचं पुन्हा एकदा 'चक दे'!

तब्बल ९ वर्षानंतर शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या सिनेमात दिसलेली हॉकीची गर्ल्स गँग पुन्हा एकदा एकत्र आली... ती शुभी मेहता या आपल्या मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्तानं...

Updated: Mar 29, 2016, 11:44 PM IST
शाहरुखच्या गर्ल्स गँगचं पुन्हा एकदा 'चक दे'! title=
सौ. कथाग्राफी

मुंबई : तब्बल ९ वर्षानंतर शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या सिनेमात दिसलेली हॉकीची गर्ल्स गँग पुन्हा एकदा एकत्र आली... ती शुभी मेहता या आपल्या मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्तानं...

२००७ साली 'चक दे इंडिया' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. बॉक्सऑफीसवर आणि प्रेक्षकांच्या मनावरही ताबा मिळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला होता... आणि आता नऊ वर्षानंतर या सिनेमातल्या सगळीच्या सगळी गर्ल्स गँग एकत्र आलेली दिसली. त्यांच्यातली मैत्री अजूनही कायम असल्याचंच यातून दिसून आलं. 

'चक दे इंडिया' या सिनेमात 'बिंदिया'ची भूमिका निभावणारी शिल्पा शुक्ला हिनं आपला बॉयफ्रेंड अपूर्व बाजपयी याच्यासोबत लग्नाची गाठ बांधलीय. शिल्पा आणि अपूर्व एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून डेट करत होते.