वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात : राधिका आपटे

राधिका आपटे. बॉलिवूडमधली एक बिंधास्त, बोल्ड आणि स्पष्ट, थेट बोलणारी नायिका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, तिला वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात, असे तिने सांगितले.

Updated: Aug 31, 2016, 03:58 PM IST
वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात : राधिका आपटे title=

मुंबई : राधिका आपटे. बॉलिवूडमधली एक बिंधास्त, बोल्ड आणि स्पष्ट, थेट बोलणारी नायिका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, तिला वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात, असे तिने सांगितले.

नुकताच राधिकाचा एक बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची बरीच चर्चाही होऊ लागली. हा तिचा हॉट लूक पार्श्च या तिच्या आगामी सिनेमातील असल्याचीही चर्चा आहे. मात्र सिनेमातील कोणताही सीन लीक झाला नसल्याचे राधिका म्हणते. 

आपल्याला जे वाटेल, तेच आपण करतो असंही राधिकाने म्हटले आहे. कॉस्च्युम्सच्या बाबतीत म्हणायचे झाले तर आपल्याला फॅशनेबल आणि वेस्टर्न कल्चरचे कपडे अधिक आवडतात, असे राधिका सांगते.