15 वर्षांचा सलमान आणि टायगर श्रॉफची आई एकाच जाहिरातीत

सलमान खान सध्याचा बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत सलमानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेत. 

Updated: Aug 31, 2016, 01:00 PM IST
15 वर्षांचा सलमान आणि टायगर श्रॉफची आई एकाच जाहिरातीत title=

मुंबई : सलमान खान सध्याचा बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत सलमानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेत. 

त्याच्या 'साजन' या सिनेमाला मंगळवारी 25 वर्षे पूर्ण झाली. या सिनेमातील त्याचा किंचित लांब केसांचा लूक त्या काळी हिट ठरला होता. याच सलमान खानने 15 वर्षांचा असताना पहिली जाहिरात केली होती. 

कॅम्पाकोलाच्या जाहिरातीत सलमान स्लीव्हलेस टीशर्ट आणि किंचितसे लांब केस अशा लूकमध्ये दिसत होता. या जाहिरातीत सलमानसोबत टायगर श्रॉफची आई आयेशा यांनीही काम केले होते.