विराट कोहलीकडून पुन्हा एकदा प्रेमाची कबुली

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा सातत्याने होत असतात. वॅलेन्टाईन डेनंतर, आता मिस्टर कुल विराट कोहलीनं पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 18, 2017, 02:40 PM IST
 विराट कोहलीकडून पुन्हा एकदा प्रेमाची कबुली title=

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा सातत्याने होत असतात. वॅलेन्टाईन डेनंतर, आता मिस्टर कुल विराट कोहलीनं पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

विराटने केला अनुष्काबरोबर प्रेमाचा खुलासा फोटोच्या सहाय्याने विराटने अनुष्काला म्हटलं I LOVE U .

बॉलिवूडी क्वीन अनुष्का शर्मा तिच्या पर्सनल रिलेशीपबद्दल नेहमीच शांत असते, पण तिचा बॉयफ्रेण्ड विराट कोहली नेहमीच या नात्याबद्दल खुलेआम बोलतांना दिसतो.

विराटने त्याचा आणि अनुष्काचा फोटो त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर डीपी म्हणून ठेवला आहे..त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाता आहेत.

कोणाचीही तमा न बाळगता विराटने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे..विराटने डीपी ठेवलेला हा फोटो युवराज सिंगच्या लग्नातला आहे.

विराट-अनुष्काने गोव्यामध्ये हा लग्नसोहळा खुपचं एन्जॉय केला होता.. इवढचं नाही तर व्हॅलेंनटाईन डे आणि इंटरनॅशनल वूमेन डेच्या दिवशी पण विराटने अनुष्काबद्दल आपली भावना व्यक्त केली होती..

आता या दोघांमध्ये प्रेम आहे हे तर कन्फर्म झालयं पण आता अनुष्काही कधी या प्रेमाची खुलेआम कबुली देते याची विराटसह त्याचे सगळे फॅन्सही वाट बघत आहेत.