बिग बजेटचा ‘महाभारत’ सिनेमा, १००० कोटींची गुंतवणूक

आजही महाभारतची क्रेझ कायम आहे. आता महाभारतावर सिनेमा काढण्यात येत आहे. त्यासाठी एका अनिवासी भारतीयाने ‘महाभारत’ सिनेमासाठी तब्बल १००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Intern - | Updated: Apr 18, 2017, 01:25 PM IST
बिग बजेटचा ‘महाभारत’ सिनेमा, १००० कोटींची गुंतवणूक title=

कोची : आजही महाभारतची क्रेझ कायम आहे. आता महाभारतावर सिनेमा काढण्यात येत आहे. त्यासाठी एका अनिवासी भारतीयाने ‘महाभारत’ सिनेमासाठी तब्बल १००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

अमेरिकेत राहणारे एक भारतीय व्यापारी ‘द महाभारत’ या चित्रपटासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. ए. श्रीकुमार मेनन करणार आहेत.

 

या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात येणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटाचे दोन भाग तयार करण्यात येणार आहेत. पहिला भाग रिलीज झाल्यानंतर ९० दिवसांनी दूसरा भाग रिलीज होणार आहे.

 

तसेच हा चित्रपट बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांच्या बरोबरीचा असणार आहे. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत हॉलिवूडचे कलाकारही तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट इंग्रजी, हिंदी शिवाय इतर १०० भाषांमध्ये तयार केला जाणार आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक लोक हा सिनेमा पाहू शकणार आहे, तसा दावा करण्यात आला.