'कबाली'चे वेड लागले, देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह

 जनीकांतचा बहुचर्चित चित्रपट कबाली, आज देशभरात प्रदर्शित होत आहे. त्या निमित्त दक्षिणेसह देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण आहे. 

Updated: Jul 22, 2016, 08:19 AM IST
'कबाली'चे वेड लागले, देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह title=

मुंबई : थलायवा रजनीकांत. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा मेगा सुपरस्टार. रजनीकांतचा बहुचर्चित चित्रपट कबाली, आज देशभरात प्रदर्शित होत आहे. त्या निमित्त दक्षिणेसह देशभरातल्या रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण आहे. 

चेन्नई असो, बंगळुरु असो, हैदराबाद, मुंबई किंवा आणखी इतर शहर किंवा गाव. सगळीकडेच रजनीकांतच्या कबालीच्या प्रदर्शनानिमित्तानं चाहते अक्षरशः उत्सव साजरा करत आहेत. चित्रपटाचं बुकिंग आधीच फुल झालंय. तर प्रेक्षकही रात्रीपासूनच थिएटरबाहेर मुक्काम ठोकून बसले आहेत. 

रजनीकांतच्या कबाली आज जगभरात रिलीज झालाय. आणि रजनीच्या चाहत्यांमध्ये जणू काही दिवाळीचा उत्साह संचारला आहे.  चेन्नई आणि मुंबईत मध्यरात्रीपासूनच चाहते वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करत आहेत. कुठे पारंपारिक वाद्य वाजवून अधिक सेलिब्रेशन सुरू आहे. तर कुठे कबालीच्या गाण्यांवर चाहते रस्त्यावरच थिरकताना दिसत आहेत. कुणी कबालीच्या वेशभूषेत चित्रपट पाहयाला आलेत.