रजनीकांतच्या कबालीचे सर्व शो हाऊसफुल्ल

रजनीकांतचा बहुचर्चित कबाली हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे..या सिनेमाबद्दल फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. सिनेमाचा 6 चा मॉर्निंग शो देखील हाऊसफुल असून वीकेंडपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल आहेत. 

Updated: Jul 22, 2016, 08:18 AM IST
रजनीकांतच्या कबालीचे सर्व शो हाऊसफुल्ल title=

मुंबई : रजनीकांतचा बहुचर्चित कबाली हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे..या सिनेमाबद्दल फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. सिनेमाचा 6 चा मॉर्निंग शो देखील हाऊसफुल असून वीकेंडपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल आहेत. 

एवढचं काय तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये या सिनेमाचे रात्री 3 चे देखील शो ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या सिनेमाबद्दल फॅन्सची क्रेझ बघता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नविन रेकॉर्ड करेल असचं चित्र दिसतये. 

कबाली सिनेमाच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा भारतीय सिनेमा जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. सिनेमात रजनीकांत कबालीश्वरन नामक डॉनच्या रुपात दिसणार असून राधिका आपटे रजनीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.