बेळगाव: मराठी टायगर्स या चित्रपटावरुन बेळगावमध्ये सुरु असलेला वाद काही संपताना दिसत नाहीय. हा चित्रपट प्रदर्शित करायला बेळगावमधल्या चित्रपटगृह मालक आणि वितरकांनी नकार दिला. त्यामुळे आता शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.
चंदगडच्या शिवसैनिकांनी हा चित्रपट शिनोळीमध्ये प्रदर्शित करायचा निर्धार केला आहे. शुक्रवारी सकाळी शिवसेना हा चित्रपट प्रदर्शित करेल. शिवसैनिकांनी शिनोळीमध्ये तंबू उभारला आहे. या तंबूमध्येच चित्रपट दाखवू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. या तंबूमध्ये पाचशे खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत.
कायदा सुव्यवस्थेचं कारण देत हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित करायला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून सीमाभागात वाहनांचे नंबर नोंद करण्याचं काम सुरु आहे.