शिल्पा शेट्टीने लॉन्च केला आपल्या मुलाच्या नावाने मोबाईल

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आयपीएलनंतर आता मोबाईल क्षेत्रात आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला आहे. 

Updated: Nov 26, 2015, 02:34 PM IST

मुंबई : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आयपीएलनंतर आता मोबाईल क्षेत्रात आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला आहे. राज आणि शिल्पा यांच्या मुलगा 'विआन' याच्या नावाने ही मोबाईल कंपनी सुरू केली असून स्मार्टफोन सिरीजमध्ये फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 

आज मुंबईत एका शानदार सोहळ्यात या 'विआन' मोबाईलचे लॉन्चिंग झाले. यावेळी सिने अभिनेते जितेंद्र, मलायका अरोरा-खान, फराह खान, आणि होस्ट मनिष पॉल उपस्थित होता. 

हा फोन एकाच वेळी सात देशांमध्ये लॉन्च झाला असून उद्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. यावेळी मनिष पॉल याने 'विआन' मोबाईलचे ४ जीबी व्हर्जन लॉन्च केले. फराह खान आणि मलायका अरोराने ८ जीबी व्हर्जन लॉन्च केले. तर अभिनेता जितेंद्र यांनी १६ जीबी व्हर्जन लॉन्च केले. 

 

व्ही-इमर्ज, व्ही-एम्पॉवर, व्ही-इटर्नल, व्ही-एन्कोअर आणि व्ही-1.8 ही श्रेणी विआन मोबाईलतर्फे ग्राहकांसाठी आणण्यात आली आहे. यापैकी पहिले चार स्मार्टफोन आहेत, तर व्ही-1.8 हा फीचर फोन आहे. लाँचिंगपूर्वी शिल्पा शेट्टीने ट्विटरवरुन आपली उत्सुकता व्यक्त केली होती.

 
विआन मोबाईलचे संचालक, शिल्पाचे पती राज कुंद्रा यांनी येत्या 12 महिन्यात किमान 2 ते 3 टक्के मार्केट शेअरचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं आहे. दर महिन्याला 3 ते 4 लाख हँडसेट्स विकले जातील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

V-1.8 हा चित्रपट केवळ 999 रुपयांना उपलब्ध आहे. किटकॅट 4.4.2 व्हर्जन असलेला विआन-इमर्ज 3 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. व्ही-एम्पॉवर लॉलीपॉप 5.1 असलेला फोन  5 हजार 299 रुपयांना असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.