बिग बॉस रिमीला घरातून का बाहेर काढत नाही?

रिमी सेनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, हे तिच्या वागण्यातून ती दाखवत आहे. तर बिग बॉस तिला का बाहेर काढत नाहीत. यामागचं कारणही तितकचं महत्वाचं आहे.

Updated: Nov 25, 2015, 09:22 PM IST
बिग बॉस रिमीला घरातून का बाहेर काढत नाही? title=

मुंबई : रिमी सेनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, हे तिच्या वागण्यातून ती दाखवत आहे. तर बिग बॉस तिला का बाहेर काढत नाहीत. यामागचं कारणही तितकचं महत्वाचं आहे.

'बिग बॉस' हा टीव्ही शो रोज बघणाऱ्या प्रेक्षकांना माहित असेल, की बिग बॉसच्या घरामध्ये जे स्पर्धक जास्त अॅकटीव्ह नसतात. त्या सर्वात आधी घराच्या बाहेर काढले जाते. 

परंतु या वेळेच्या बिग बॉस सिझन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की, अमन वर्मा सारख्या प्रेक्षक बाहेर काढल्यानंतर देखील रिमी सेनला का बाहेर नाही हा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल ना...? 

या मागील खरे कारण आहे ते म्हणजे 'बिग बॉस' या शो मध्ये रिमी सेनला मागील दोन सिजन पासून निर्माते तिच्याशी बोलत होते, पंरतु या सिझनमध्ये ते शक्य झाले कारण की रिमी सेनला इतर कन्टेशटन पेक्षा जास्त पैसे देण्यात आले आहे. 

जेथे इतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना लाखात पैसे देण्यात आले तर, रिमी सेनला एकटीला २ करोड रूपये देऊन साईन करण्यात आले आहे. त्यामुळेच कदाचीत बिग बॉसचे निर्माते कदाचित रिमी सेनला 'बिग बॉसच्या' घरातून बाहेर पडून देत नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.