शक्ती कपूरच्या निधनाच्या अफवांना मुलांने फेटाळले

बॉलीवूड़ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या अफवेचे खंडन केले असून अत्यंत बकवास पसरविल्या जात आहेत. 

Updated: Feb 23, 2015, 08:17 AM IST
शक्ती कपूरच्या निधनाच्या अफवांना मुलांने फेटाळले  title=

मुंबई : बॉलीवूड़ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतने आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या अफवेचे खंडन केले असून अत्यंत बकवास पसरविल्या जात आहेत. 

सोशल मीडियामध्ये अशी अफवा पसरली की ५६ वर्षीय अभिनेता शक्ती कपूर यांचे एका कार अपघातात निधन झाले. ते 'एक व्हिलन' ची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे वडील आहेत. 

सिद्धांतने स्थिती स्पष्ट करताना ट्विट केला की, या सर्व अफवा आहेत. माझे वडील व्यवस्थित आहे. कोणाची नजर लागू नये, कोणताही अपघात झाला नाही. कृपया सर्वांनी रिट्विट करा. श्रद्धाने लगेच त्याच्या ट्विटला रिट्विट केले. 

यापूूर्वी आयुष्यमान खुरान, लता मंगेशकर, नाना पाटेकर, यो यो हनी सिंग, अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूच्या अफवा उठविण्यात आल्या होत्या.

शक्ती कपूर २०१४ मध्ये मी. जो बी कार्वोल्होमध्ये दिसले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.