बदलापूर : रिव्ह्यू - वरूण आणि नवाजुद्दीनचा शानदार अभिनय

'एक हसीना थी' आणि 'जॉनी गद्दा' सारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा चित्रपट 'बदलापूर' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्या ट्रेलरपासूनच चर्चेत राहिला आहे. श्रीराम राघवन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अपेक्षांना न्याय दिला आहे. 

Updated: Feb 20, 2015, 10:08 PM IST
बदलापूर : रिव्ह्यू - वरूण आणि नवाजुद्दीनचा शानदार अभिनय title=

मुंबई : 'एक हसीना थी' आणि 'जॉनी गद्दा' सारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा चित्रपट 'बदलापूर' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्या ट्रेलरपासूनच चर्चेत राहिला आहे. श्रीराम राघवन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अपेक्षांना न्याय दिला आहे. 

साधारण काहणी असूनही कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने या चित्रपटाने एक उंची गाठली आहे. विशेष करून वरूण आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. श्रीराम राघवन यांनी सिद्ध केले की ते प्रतिभावंत दिग्दर्शक आहे. 

या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट बदला म्हणजे रिव्हेंजवर बेतला आहे. बदलापूर मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले शहर आहे. साधारण बदला याचे दोन अर्थ होतात एक रिव्हेंज आणि दुसरे 'परिवर्तन' या दोन्हींचा अर्थ चांगल्या प्रकारे या चित्रपटात मांडण्यात आला आहे. 

चित्रपटाची काहणी - 
चित्रपटाची काहणी अशी आहे... रघू (वरूण धवन) आपली पत्नी मीशा (यामी गौतम) आणि मुलासह आनंदी जीवन जगत असतात. रघूच्या जीवनात सर्व काही सुरळीत सुरू असते. पण एक घटना त्याचे जीवनच बदलून टाकते. बँकेत दरोडा पडल्यानंतर डाकू लायक( नवाजुद्दीन सिद्धिकी) आणि त्याचा साथी हरमन (विनय पाठक) रघूच्या घरात लपतात. दोन्ही डाकू रघूचे घर उध्वस्त करतात. घरात झालेल्या संघर्षात रघूची पत्नी मीशा आणि मुलगा मारला जातो. या घटनेनंतर रघू तटून जातो आणि बदला घेण्यासाठी तयार होतो. 

लायक आपला साथीदार हरमनला वाचविण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतो. लायक जेलमधून सुटल्यानंतर रघू आपला बदला घेण्यासाठी सज्ज होतो. 

अभिनय - 
वरूण धवनने आपल्या करीअरच्या सुरूवातीला अशा प्रकारचा चित्रपट करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. या चित्रपटात त्याला आपला अभिनय दाखविण्याची संधी मिळाली आहे. अभिनयाच्या बाबतीत वरूण धवनचा हा सर्वात चांगला चित्रपट आहे. वरूणने आपल्या अभिनयाने सिद्ध केले की तो लंबी रेस का घो़डा आहे.
चित्रपटात नवाजुद्दीनचाही अभिनय जबरदस्त झाला आहे. आपल्या भूमिकेने त्याने अनेक ठिकाणी हेलावून सोडले आहे. नवाजुद्दीनने साधारण संवादांमध्येही प्राण फुंकले आहेत. नवाजची प्रेमिका असलेली (झुमली) हुमा कुरेशीने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. शोभा (दिव्या दत्ता) एक एनजीओ चालवते, तिने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. 

संगीत 
चित्रपटाचे संगीत यापूर्वी हिट झाले आहे. 'बदलापूर'मद्ये संगीत सचिन याला संगीत दिले आहे. चित्रपटाचे संगीत काहणीच्या अनुसरून आहे. 

कसा आहे चित्रपट 
एकूणच तुम्हांला मसाला चित्रपटापेक्षा काहीसा वेगळा चित्रपट पाहायचा असेल आणि तुम्ही नवाजुद्दीन सिद्दिकीचे प्रशंसक आहात तर 'बदलापूर' जरूर पाहिला पाहिजे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.