मुंबई: सुरुवातीला मैत्री मग दुश्मनी आणि पुन्हा मैत्री हा बॉलिवूडपटांचा एकेकाळचा सुपर हिट फॉर्म्यूला… पण अशीच काहीशी कथा वास्तवात बॉलिवूडच्या दोन बड्या स्टार्सच्या बाबतीत घडलीय... आणि ते स्टार्स आहेत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दबंग सलमान खान...
पवित्र रमजान सणाच्यानिमित्तानं बाबा सिद्धीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सलमान, शाहरुख एकत्र आले आणि आजवरचे सगळे राग-लोभ विसरुन त्यांनी एकमेकांना अलिंगन दिलं. गेल्य़ावर्षीही रमजान सणाच्या निमित्तानं इफ्तार पार्टीत हे दोन स्टार एकत्र आले होते आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षांनंतर या दोन बड्या स्टार्सची पुन्हा एकदा गळाभेट झाली.
2008मध्ये अभिनेत्री कतरीना कैफच्या बर्थडे पार्टीत सलमान-शाहरुख यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी एकमेकांचं तोंड पाहिलं नाही. मात्र गेल्यावर्षी इफ्तार पार्टीत त्यांची गळाभेट झाली आणि गेल्यावर्षभरात त्यांच्यातला वाद निवळला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.