रणवीर सिंगला नाही व्हायचयं म्हातारं!

 बॉलिवूडमधील लव्हरबॉय रणवीर सिंग आपला २९ वा बर्थडे सेलिब्रेट करतोय. 

Updated: Jul 6, 2014, 04:03 PM IST
रणवीर सिंगला नाही व्हायचयं म्हातारं! title=
सौजन्य, टिवटर

मुंबई :  बॉलिवूडमधील लव्हरबॉय रणवीर सिंग आपला २९ वा बर्थडे सेलिब्रेट करतोय. 

मात्र लव्हर बॉयने वाढदिवसाच्या एक दिवस आधी टिवटरवर लिहिले की मला म्हातारं नाही व्हायचंय.

 

And yea, the Birthday's coming up..meh..i don't wanna grow older..

— Ranveer Singh (@RanveerOfficial) July 4, 2014

रणवीर मस्ती आणि आनंदी जीवनावर विश्वास ठेवतो. रणवीर सध्या जोया अख्तरचा सिनेमा दिल धडकने दो च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्या फिल्ममध्ये रणवीरसोबत अनुष्का शर्मा, अनिल कपूर, फरहान अख्तर आणि प्रियंका चोप्रा ही दिसणार आहेत. 

रणवीर बोलला की, दिल धडकने दो खूप मस्त चित्रपट आहे. एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणं हे माझं भाग्यच आहे. जोया तर खूपच अफलातून व्यक्ती आहेत. तसेच खूप संवेदनशील आणि व्यवहारी आहे. 

फिल्मचे शूटींग जहाजावर करणे हा वेगळाच अनुभव आहे. फिल्मच्या टिमसोबत काम करायला खूप मज्जा येतेय. कोणीही मस्ती करण्यासाठी कमी नाहीत. 

रणवीर आतापर्यंत सिविटावसिया, लास्पेझिआ, ऑल्बिया, पोटरेवेनेरे, रोम, नॅपल्ज, बार्सिलोनाला फिरला आहे. तसेच तिथे जाऊन त्यांने वेगवेगळ्या परदेशातील कॅप्स, चुरेझ, न्यूटेल्ला पिझ्झा, मग केक, बेकलावा,आईस्क्रिम, डोनट्स, सॉफल वोल्कॅनो केक खाल्ले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.