सलमानचा महिला आयोगाला ठेंगा

  राज्य महिला आयोगासमोर सलमान खान सुनावणीसाठी हजर झाला नाही. 

Updated: Jun 29, 2016, 07:11 PM IST
सलमानचा महिला आयोगाला ठेंगा title=

मुंबई :   राज्य महिला आयोगासमोर सलमान खान सुनावणीसाठी हजर झाला नाही. 

बलात्कारा संदर्भात सलमाननं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सलमानला महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. 

पण सलमान महिला आयोगासमोर हजर झालाच नाही. त्यानं वकिलामार्फत स्पष्टीकरण पाठवलं. पण या स्पष्टीकरणावर महिला आयोगाचं समाधान झालं नाही. त्या स्पष्टीकरणात तथ्य नसल्याचं महिला आयोगानं म्हंटलंय.

 याप्रकरणी सलमाननं महिला आयोगासमोर 7 जुलैला हजर राहाण्याचे आदेश देण्यात आलेत.  'सुल्तान'च्या शुटिंगहून आल्यावर बलात्कार झालेल्या महिलेइतकाच थकून जात असे, असं वक्तव्य सलमाननं केलं होतं.

 
 
 या विधानानंतर देशभरातल्या महिला संघटनांनी सलमानवर टीकेची झोड उठवली होती.