नवी दिल्ली : बॉलिवूडच्या ‘दबंग’ खाननं आपल्या सिनेमाच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईचं सेलिब्रेशन एका खास ढंगात केलंय.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या सिनेमानं आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्डस तोडत 300 करोडचा आकडा गाठल्याचं सांगण्यात येतंय. आपल्या सिनेमाचं हे यश सलमाननं एका ‘खास स्क्रिनिंग’चं आयोजन करत केलं.
KICK screening for the hearing impaired. With subtitles and sign language pic.twitter.com/nlreu2aOi7
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 12, 2014
हे खास स्क्रिनिंग होतं त्या मुलांसाठी जे ऐकू शकत नाहीत... या मुलांसोबत आपला आनंद साजरा करत सलमाननं हे काही क्षण सोशल वेबसाईट ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलेत. या मुलांसाठी ‘किक’च्या खास स्क्रिनिंगचं आयोजन थम्स अपच्या वीर कॅम्पेन, सामाजिक संस्था बिइंग ह्युमन फाऊंडेशन आणि अमेरिका इंडिया फाऊंडेशननं एकत्र येऊन केलं होतं.
Did these screenings at INOX in B’luru, Mumbai and Noida pic.twitter.com/1iZwnIryZN
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 12, 2014
या मुलांना ऐकू येत नसल्यानं त्यांना हा सिनेमा समजण्यासाठी सब टायटल आणि ईशाऱ्यांनी समजावण्याची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती. या खास स्क्रिनिंगची व्यवस्था आयनॉक्सच्या बंगळुरू, मुंबई आणि नोएडामध्ये करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.