मुंबई : सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने सर्व रेकॉर्ड तोडले, पण हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पाहावा अशी इच्छा सलमानने व्य्कत केली होती. पण अजून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सलमानने उत्तर मिळेपर्यंत ट्विट करण्याचा निर्धार केला आहे.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून कोणताही प्रतिसाद आला नसला, तरीही सलमानने आशा सोडलेली नाही. सलमान म्हणतो, "दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी 'बजरंगी भाईजान' पाहावा. ते जोपर्यंत सिनेमा पाहणार नाहीत, तोपर्यंत मी त्यांना ट्विट करतच राहणार".
यापूर्वी सलमानने त्याबाबत ट्विट करून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 'बजरंगी भाईजान' पाहण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र सलमानच्या या ट्विटला अद्याप कोणताही रिप्लाय आलेला नाही.
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'बजरंगी भाईजान'ने सलमानच्या सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. 'बजरंगी भाईजान'ने पहिल्या तीन दिवसात जवळपास 100कोटी रुपयांची कमाई केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.