सलमान खान हुमा कुरेशीवर भडकला ?

बॉलीवूडचा बॅड बॉय सलमान खान पुन्हा एकदा भडकला आहे.

Updated: Feb 7, 2016, 06:51 PM IST
सलमान खान हुमा कुरेशीवर भडकला ? title=

मुंबई: बॉलीवूडचा बॅड बॉय सलमान खान पुन्हा एकदा भडकला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीवर सलमान खान नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. हुमा कुरेशी आणि सलमानचा भाऊ सोहेल खान यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याच्या चर्चा होत्या. त्यावरुनच सलमान हुमावर भडकला असल्याचं बोललं जात आहे. 

डिसेंबरमध्ये सलमानच्या वाढदिवसाची पार्टी पनवेलमध्ये झाली, या पार्टीला हुमाही आली होती, पण सलमाननं या पार्टीमध्ये हुमाकडे दुर्लक्ष केलं अशी माहिती मिळतेय.

सोहेल खानची फ्रँचायजी मुंबई हिरोजची हुमा मागच्या वर्षी ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होती, पण यंदा मात्र किर्ती सनोन सोहलच्या टीमची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे. सोहेल खान मोठ्या भावासारखा असल्याची प्रतिक्रिया हुमानं दिली आहे, तर सोहेलची पत्नी सीमानंही या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.