सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Updated: Aug 20, 2015, 07:12 PM IST
सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी title=

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.

लाहोर हायकोर्टाचे न्यायाधिश शाहिद बिलाल हसन यांनी पाकिस्तानात हा चित्रपट रिलीज होणार नाही, असा आदेश दिलाय. मात्र कोर्टानं हाफिज सईदच्या वकिलांना ८ ऑगस्टला विचारलं की, जे चित्रपट बॅन असतात त्याची सीडी किंवा डिव्हिडी बाजारात सहजपणे उपलब्ध होते.  

पाकिस्तानी सेंसर बोर्डानंही 'फँटम'ला अजून ग्रीन सिग्नल दिला नाहीय. ट्रेलरवरून या चित्रपटात पाकिस्तानातील हाफिज सईदला दहशतवादी ठरवतं, मुंबई हल्ल्याचा दोषी म्हटलंय. जेव्हा की, पाकिस्तान कोर्टानं त्याला दोषी मानलं नाही, असा युक्तीवाद सईदच्या वकिलांनी कोर्टात केला.

दहशतवादाशी निगडित विषयांवरील चित्रपटांवर यापूर्वीही पाकिस्तानात बंदी घातली गेलीय. यापूर्वी सलमानचा 'एक था टायगर' आणि सैफच्याच 'एजंट विनोद' चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. 

अधिक वाचा - http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/pakistan-uae-ban-riteish-deshmukh-starrer-bangistan/281495

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.