मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रणव धनावडेने १००९ धावा करताना क्रिकेट जगतात नवा रेकॉर्ड बनवला. त्याच्या या विक्रमाचे कौतुक देशभरात झाले. मात्र साला खडूसची अभिनेत्रीसाठी हे सर्व काही विशेष आहे.
प्रणवने ३२३ चेंडूत नाबाद १०९ धावा स्कूल क्रिकेटचे सारे रेकॉर्ड तोडले. साला खडूसची अभिनेत्री रितीका सिंगने प्रणवला त्याच्या कामगिरीबद्दल अनोख्या पद्धतीने शुभेच्छाही दिल्या.
तिने शुभेच्छा देण्याचे कारण म्हणजे रितीकाही प्रणवच्याच शाळेची विद्यार्थ्यिनी आहे. तसेच तीही कल्याणमध्येच राहते. यामुळेच तिने त्याचे व्हिडीओद्वारे विशेष कौतुक केले.
आर. माधवनच्या नुकत्याच आलेल्या चित्रपटात रितीकाने मुख्य भूमिका केली होती. यात तिने बॉक्सरची भूमिका केली होती.