पाकिस्तानी चित्रपटात काम करायला ऋषी कपूर यांचा नकार

अभिनेते ऋषी कपूर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.

Updated: Aug 21, 2016, 06:21 PM IST
पाकिस्तानी चित्रपटात काम करायला ऋषी कपूर यांचा नकार  title=

मुंबई : अभिनेते ऋषी कपूर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे. पाकिस्तानचे दिग्दर्शक नदीम बैग यांनी याची कबुली दिली आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट जवानी फिर नही आनी 2 मध्ये भूमिका करण्याबाबत ऋषी कपूर यांना विचारणा करण्यात आली होती, असं बैग म्हणाले आहेत. 

एका भारतीय अभिनेत्याला घेऊन पाकिस्तानात चित्रपट करण्यापेक्षा दिग्दर्शकांनी हा चित्रपट भारतामध्ये रिलीज करावा अशी मागणी ऋषी कपूर यांनी बैग यांच्यापुढे केली होती. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मात्र या चित्रपटाला भारतात यश मिळेल का नाही याबाबत साशंकता होती.