या अभिनेत्रीवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रम्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय... 

Updated: Aug 23, 2016, 10:08 PM IST
या अभिनेत्रीवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा  title=

मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रम्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय... 

सार्क युवा परिषदेसाठी इस्लामाबादमध्ये गेल्या असताना रम्या यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. 

पर्रीकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली होती. त्यावर रम्या यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता वाद निर्माण झालाय.. 

कुर्ग इथं एक वकील के. विठ्ठल गौडा यांनी रम्यांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केलाय... भाजपा नेत्यांनीही रम्यांच्या विधानावर टीका केली असली तरी आपण काही चुकीचं बोललो नसल्याचा दावा रम्या यांनी केला.

दरम्यान, आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास अभिनेत्री रम्याने नकार दिला आहे.