चेन्नई: सुपरस्टार रजनीकांत त्याचा पासपोर्ट घरीच विसरला . चेन्नई एअरपोर्टवर पोहचल्यानंतर त्याला आपण पासपोर्ट विसरलो असल्याचं लक्षात आलं.
आपला आगामी चित्रपट काबालीच्या शूटिंगसाठी रजनीकांत मलेशियाला जायला निघाला होता. एमएच 183 या विमानानं तो मलेशियाला जाणार होता. पण पासपोर्ट विसरल्याचं लक्षात येताच रजनीकांतनं आपल्या सहकाऱ्याला सांगितलं, आणि त्याला पासपोर्ट आणायला पाठवलं.
पासपोर्ट येईपर्यंत रजनीकांत चेन्नई एअरपोर्टवरच थांबला होता. त्याला पाहण्यासाठी मग चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती. पासपोर्ट आल्यानंतर अखेर रजनीकांत 11 वाजून 47 मिनिटांचं विमान पकडून मलेशियाला गेला.
रजनीकांतचा काबाली हा चित्रपट मे महिन्यामध्ये रिलीज होणार आहे.