कपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस

मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.

Updated: Feb 2, 2017, 10:49 AM IST
कपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस title=

मुंबई : मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. ओशिवारा पोलीस चौकीत कपिल आणि इरफान खान विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस कपिल आणि इरफान यांच्यासह आणखी ४ लोकांविरोघात खटला दाखल करणार आहे.

कपिल आणि इरफानवर ओशिवारा पोलीस ठाण्यात डीएलएफ एन्क्लेव अपार्टमेंटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी ओशिवारा पोलिसांनी कपिल शर्मा आणि इरफान खानवर महाराष्ट्र रीजनल टाउन प्लानिंग(MRTP) कायद्याअंतर्गत कलम 53(7) नुसार तक्रार दाखल केली होती.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्यांच्यावर कोर्टात चार्जशीट दाखल केली जाणार आहे. दोघांनी रिडेव्हलपमेंटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आता इरफान आणि कपिल हे फ्लॅट विकण्याच्या तयारीत आहे आणि अनधिकृत बांधकामाची जबाबदारी ते डीएलएच टाकत आहेत.