मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर आशिष शेलार यांनी सांगितलं, 'आज एमसीएच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, आयपीएल कोलकाता टीमचा मालक शाहरुख खानवर वानखेडेवर असलेली बंदी आता दूर करण्यात आलीय. अध्यक्ष शरद पवार यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव समितीसमोर मांडला आणि सर्वसंमतीनं हा निर्णय घेण्यात आला.'
दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं १८ मे २०१२ला शाहरूख खानवर एमसीए परिसरात प्रवेश करण्यासंदर्भात ५ वर्षांची बंदी घातली होती. या निर्णयाच्या दोन दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या मॅचनंतर शाहरुख आणि सुरक्षा स्टाफमध्ये वाद झाला होता, यानंतर शाहरूखवर बंदी घालण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.