शाहरूख खानकडून 'बाहुबली'चं कौतुक

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाचं कौतुक केलं आहे. 

Updated: Aug 2, 2015, 11:49 PM IST
शाहरूख खानकडून 'बाहुबली'चं कौतुक title=

मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाचं कौतुक केलं आहे. 

'बाहुबली हा मोठ्या मेहनतीने तयार करण्यात आलेला सिनेमा आहे, या चित्रपटाच्या माध्यमामधून प्रेरणा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार, आपण ठरवलं तर आपण आकाशाताही भरारी घेऊ शकतो,'  असं ट्वीट शाहरुखने केलंय. 

अनेक प्रादेशिक भाषांमध्येही बाहुबलीला मोठे यश लाभलं आहे,

बाहुबली या चित्रपटाचा पुढील भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. बाहुबली सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रामया कृष्णन, सत्यराज, नासर अशा अनेक दिग्गजांच्या भूमिका आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.