'जाऊ द्या ना बाळासाहेब'चं मोशन पोस्टर रिलीज

जाऊ द्या ना बाळासाहेब या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

Updated: Aug 11, 2016, 12:56 PM IST
'जाऊ द्या ना बाळासाहेब'चं मोशन पोस्टर रिलीज title=

मुंबई : जाऊ द्या ना बाळासाहेब या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. गिरीश कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी वराच्या वेशामध्ये दिसतोय, तर बॅकग्राऊंडला अजय-अतुलचं ठेका धरायला लावणारं संगीत आहे. सैराटच्या यशानंतर अजय-अतुल यांचा हा आगामी चित्रपट आहे. 

या चित्रपटातून गिरीश कुलकर्णीनं दिग्दर्शनात आणि अजय-अतुलनी प्रॉडक्शनमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवलं आहे. गिरीश कुलकर्णीबरोबर या चित्रपटात मोहन जोशी, रीमा लागू, सई ताम्हणकर, पुर्वा पवार, किशोर चौघुले, श्रीकांत यादव आणि सविता प्रभुणे असे तगडे कलाकार आहेत. झी स्टुडिओचा हा आगामी चित्रपट 7 ऑक्टोबर 2016 ला रिलीज होणार आहे. 

पाहा 'जाऊ द्या ना बाळासाहेब'चं मोशन पोस्टर